G-7, Shivalika Complex, Hingna, Nagpur-22

contact@jivanaadhar.org | +91 7770011004

Water Cane
Slide 1
Slide 1
Slide 1
Slide 1
previous arrow
next arrow

संस्थेचा परिचय

आपल्या भारत देशाला अत्यंत समृद्ध संत परंपरा आणि सामाजिक, आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. अनेक संतांनी व महापुरुषांनी आपल्या जीवन कार्यामध्ये जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे असे सिद्ध करून दाखवले आहे. म्हणूनच तर असे म्हटले जाते की,

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारे ।।

संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्याला हीच शिकवण देतात की चंदन ज्याप्रमाणे स्वतःचा देह झिजवून इतरांना सुगंध देते अगदी त्याचप्रमाणे जनसेवेचे व्रत घेणाऱ्याने स्वतःचा देह झिजवून मानव सेवेचे व्रत अविरत सुरू ठेवले पाहीजे.

याच मानव सेवेच्या स्वर्णिम पथावर सन् २०१६ पासून जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अंतर्गत संस्थापक अध्यक्ष सेवाभावी मा. श्री. जीवन उर्फ धनंजय सुरेखा रमेशपंत जवंजाळ यांची अविरत वाटचाल सुरू आहे. गोरगरीब, बेघर असलेल्या परिवारांना मदत करणे, निराधाराला आधार देणे, गरजुंना अन्नधान्याचे वाटप करणे, अपंगांना सहारा देणे, अपघातग्रस्तांचा जीव वाचविणे रुग्णांना मेडीकल सेवा उपलब्ध करुन देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणे, वेळोवेळी आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शीबिर, दंत तपासणी शिबिर, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे इ.

अश्या विविध सेवा उपक्रमाद्वारे जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था निस्वार्थ भावनेने मानव सेवेचे हे सेवापुष्प प्रत्येक दिवशी ईश्वरचरणी अर्पित करीत असते.

संस्थेचे विविध सेवा उपक्रम

गरजूंसाठी अन्न

गरजूंसाठी निवारा

गरजूंसाठी शिक्षण

गरजूंसाठी वैद्यकीय सेवा

गरजूंसाठी रुग्णवाहिका सेवा

दिव्यांग व्यक्तिंची सेवा

रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा सेवा ऊपक्रम

रोजगार- जीवन आधार सेवा उपक्रम

शववाहिका सेवा उपक्रम

Organising Committee!!

Our Events

रक्तदान व रोग निदान शिबीर

जीवन आधार सामाजिक बहुद्धेशीय सामाजिक संस्था नागपूर, पत्रकार संघ यांच्या संयुक्त विधमाणे चांदुर बाजार तालुक्यातील माधान येथे भव्य मोफत रोग निदान व रक्तदान शिबीर संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्या मार्गदर्शना मध्ये संपन्न.

दिवाळी उपक्रम

जीवन आधार सामाजिक बहुद्धेशीय सामाजिक संस्था नागपूर , पत्रकार संघ यांच्या दिधमाणे चांदुर बाजार तालुक्यातील 400 गोरगरीब, अपंग, अनाथांना, दिवाळी निमित्त संस्थापक अध्यक्ष्य जीवन जवंजाळ तर्फे किराणा किट, ब्लॅंकेट व कपडे, साडी वाटप.

रक्तदान व रोग निदान शिबीर

जीवन आधार सामाजिक बहुद्धेशीय सामाजिक संस्था नागपूर , व जगदंब कबड्डी क्लब चांदुर बाजार यांच्या संयुक्त विधमाणे शालेय जिल्हास्तरीय १४ वर्ष वयोगट व १७ वर्ष वयोगट मुली व मुले कबड्डी खेळाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ यांच्या मार्गदर्शना मध्ये संपन्न.

Our Feature Videos

एक हाथ मदतीचा || जनसेवा हीच ईश्वरसेवा

Contact Info

+91 7770011004

contact@jivanaadhar.org

Shop No. G-5, G-7, Shivalika Complex, Near H.P Petrol Pump, Hingna Naka, M.I.D.C Hingana Road, Pin Code : 440022

© 2023 Jiwan Aadhaar – All right reserved. Powered by Bravura Multimedia Pvt. Ltd.